प्रतिनिधी /खानापूर
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एकदिवसीय धरणे आंदोलन सोमवारी आयोजित करण्यात आले होते. यासाठी खानापूर तालुका म. ए. समितीचे शेकडो कार्यकर्ते या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. सोमवारी सकाळी 7.30 वाजता येथील शिवस्मारकातील शिवाजी पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले. यानंतर जय भवानी जय शिवाजी… बेळगाव, खानापूर, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा देवून कार्यकर्ते कोल्हापूरकडे रवाना झाले.
यावेळी समिती नेते प्रकाश चव्हाण, आबासाहेब दळवी, यशवंत बिरजे, रामा खांबले, रमेश धबाले यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी बाळासाहेब शेलार, दीपक देसाई, ईश्वर बोबाटे, प्रल्हाद मादार, मुरलीधर पाटील, कृष्णा मन्नोळकर, अमृत पाटील, रुक्माण्णा झुंजवाडकर, शामराव पाटील, मऱ्याप्पा पाटील, नारायण कापोलकर, विठ्ठल गुरव, शिवाजी पाटील, शिवाजी गुरव, वसंत सुतार, सतोष पाटील, रमेश देसाई, पिंटू नावलकर, वसंत नावलकर, राजू लक्केबैलकर, गंगाराम पाटील, प़ृष्णा कुंभार, म्हात्रू धबाले, परशराम चोपडे, हणमंत मेलगे, दिगंबर देसाई, जयराम देसाई, लक्ष्मण कसर्लेकर, जयसिंग पाटील, बाबुराव पाटील, जयवंत पाटील, प्रसाद दळवी यासह अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होण्यासाठी कोल्हापुरात दाखल झाले होते.









