अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूमागे ‘लव्ह जिहाद’ हे कारण असेल आणि यामागे कोणती संघटना असेल तर पोलीस या गोष्टीचा कसून तपास करतील आणि जबाबदार संघटनेची ओळख पटवून दोषींना योग्य़ सीक्षा देतील असे भाजप आमदार राम कदम यांनी सांगितले. तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणाशीझान खानला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर भाजप आमदारांनी आपल्या सोशलमिडीयावर आपला व्हिडिओ शेअर करून सांगितले.
तुनिषा शर्मा हिने आत्महत्या केली. त्यानंतर आज तपासाची चक्रे गतिमान झाली असून आज सकाळी तुनिषाचा कथीत प्रियकर शीशान खान याला पोलीसांनी अटक केली. त्याच्या अटकेनंतर भाजपचे आमदार राम कदम यांनी आपला एक व्हिडिओ सोशल मिडीयावर जारी केला आहे. त्या व्हिडिओत ते म्हणाले कि, “अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणात जर लव्ह जिहाद असेल तर पोलीस त्याची कसून चौकशी करतील. तसेच या प्रकरणामागील संघटनेवर कारवाई करतील. राज्यातील पोलीस याचा तपास करत असून तुनिषा शर्माच्या कुटुंबाला नक्कीच न्याय मिळेल.” तुनिषा शर्माच्या आईने केलेल्या तक्रारीच्या आधारे अभिनेता शीझान खान याला अटक करण्यात आली असून त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
आमदार कदम पुढे म्हणाले “या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि ते लव्ह जिहादचे प्रकरण आहे की काहीही आहे याचा सर्व बाजूंचा विचार केला जाईल. सिद्ध झाल्यास आरोपींना सोडले जाणार नाही. तुनिषाच्या कुटुंबाला 100% न्याय मिळेल,”
तुनिषा शीझान खानसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे मानले जात होते. 15 दिवसांपूर्वी दोघांचे ब्रेकअप झाले होते. त्यानंतर तुनिषा डिप्रेशनमध्ये गेली होती. 21 वर्षीय अभिनेत्रीने शनिवारी शूटिंग सेटवर आत्महत्या केली होती. शीझान खानविरुद्ध आयपीसी कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. या प्रकरणाचा खून आणि आत्महत्या अशा दोन्ही बाजूंनी तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








