मधुसूदन पत्की यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी / बेळगाव
मानवी भावभावनांना कथांच्या माध्यमातून जी. ए. कुलकर्णी यांनी गुंफले. समाजातील वास्तवता मांडण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या कथांमधून केला आहे. आतड्यांना पीळ पाडणारा लेखक म्हणून त्यांना ओळखले जाते, असे गौवोद्गार मधुसूदन पत्की यांनी काढले.
लोकमान्य ग्रंथालयाच्यावतीने जी. ए. कुलकर्णी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ते म्हणाले, सांज शकुन या पुस्तकामध्ये मांडण्यात आलेल्या कथा समाज जीवनाचे दर्शन घडवतात काजळ माय हे पुस्तक नातेसंबंध अधोरेखित करते त्यांनी केवळ माणूसच नाही तर प्राण्यांच्या प्रेम कथा देखील मांडले आहेत त्यांच्या प्रत्येक कथेमध्ये नाविन्यता जाणवते वेगळे विश्व उलघडण्याचा प्रयत्न केला जातो.
त्यांच्या कथा माणसाला माणुसकी शिकवण्राया आणि विचार लावण्राया आहेत. एका कथेत प्राण्यांमधील बळी हा पुढे जाऊन नरबळी कसा झाला हे सुंदररीत्या एका वाक्यातून दर्शवून देतात. हीच त्यांची प्रतिभा त्यांना लेखक म्हणून एक महत्त्वाचे स्थान मिळवून देते असे पत्की म्हणाले.
कार्यक्रमाची सुरुवात जीए कुलकर्णी व साने गुरुजी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली स्वागत व प्रास्ताविक जगदीश कुंटे यांनी केले परिचय विद्या देशपांडे यांनी करून दिला सुधीर जोगळेकर यांनी यांचा सत्कार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अनघा वैद्य यांनी केले.









