चिनी पिस्तूलसह ग्रेनेड जप्त
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील बांदिपोरा येथे पोलीस आणि सीआरपीएफने लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली. इमाद अमीन चोपन आणि ताहिर आह भट अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी दोघांकडून शस्त्रास्त्रेही जप्त केली आहेत. बांदिपोराहून श्रीनगरला जात असताना दोघांना पकडण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याकडून चिनी पिस्तूलसह ग्रेनेड आणि डिटोनेटर जप्त केले आहे. गेल्या आठवडय़ाभरात झालेली ही दुसरी मोठी कारवाई आहे.









