सांगली शहरातील कर्नाळ रस्त्यावरील दत्तनगरमध्ये पहाटेच्या सुमारास धाडसी दरोडा पडला. पाच ते सहा दरोडेखोरांनी एका बंगल्याच्या मागील बाजूने घुसून घरातील लोकांना दमदाटी करत आणि काहींचे हातपाय बांधून सुमारे चार लाख रुपयांचे सोन्या- चांदीचे दागिने लंपास केले.ज्यांच्या बंगल्यात हा दरोडा पडला त्या आशिष चिंचवाडे यांनी याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अज्ञात पाच ते सहा जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व 6 दरोडेखोर बंगल्यात घुसताना चेहऱ्यावर मास्क, तोंडाला काहीही न बांधता उजळमाथ्याने घुसले होते. त्यामुळे ज्या घरात चोरी झाली त्या घरातील लोकांकडून माहिती घेऊन आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
Previous Articleलाखो लिंगायत पंचमसाली बांधवांचे आंदोलन
Next Article जलवाहिनीच्या गळतीमुळे भाताची मळणी पाण्याखाली








