चीनमधल्या कोविड प्रकरणांची लाट आता भारतापर्यंत आली असून कोव्हीड 19 चा नविन व्हेरियंटची तीन प्रकरणे भारताता आढळली असून यामुळे सध्या आरोग्य क्षेत्रात खळबळ माजली आहे.
कोव्हीड 19 चा सबव्हेरियंट असलेल्या BF.7 चे भारतात पहिले प्रकरण गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरद्वारे आढळून आले आहेत. आतापर्यंत, गुजरातमध्ये दोन प्रकरणे नोंदवली गेली असून ओडिशातून एक प्रकरण समोर आले आहे, असे ते म्हणाले.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या कोविड आढावा बैठकीत, तज्ञांनी सांगितले की, सध्या कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाली नसली तरी, सध्याच्या आणि उद्याच्या प्रकारणांचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना एका आरोग्य उच्चाधिकाऱ्याने सांगितले कि, चिनी शहरांना सध्या ओमिक्रॉन या अतिसंक्रमणाचा फटका बसत असून नविन व्हेरियंट असलेल्या BF.7 जो मुख्यत: बीजिंगमध्ये पसरलेला मुख्य प्रकार आहे. हा व्हेरियंट देशात कोविड संसर्गा मोठ्या प्रमाणात पसरण्यास हातभार लावत आहे.
Previous Articleकाँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय कुडतरकर यांचे निधन
Next Article मध्यप्रदेशात 39 जणांना सात वर्षांचा कारावास









