Corona : चीनमध्ये कोविडच्या प्रकरणांमध्ये अभूतपूर्व वाढ होत असताना केंद्र सरकारने लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचा आणि कोव्हीड संसर्ग होण्यापासून बचाव करण्यासाठी सावधपणे राहण्यासाठी डोस घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच देशवासियांना घाबरून जाण्याची गरज नाही असे सांगून नीती आयोगाच्या आरोग्य विभागाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी लोकांनी कोविड-19 प्रोटोकॉल आणि मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे असा सल्ला दिला.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज चीनमध्ये वाढणाऱ्य़ा कोव्हीड प्रकरणावर आढावा बैठक घेतली. या बैठकीला निती आयोगाच्या आरोग्य समितीचे सदस्य डॉ. व्हीके पॉल उपस्थित होते. बैठकीनंतर डॉ. पॉल पत्रकारांशी बोलताना म्हणाले, “ भारतातील पात्र लोकसंख्येपैकी केवळ 27-28 टक्के लोकांनी कोविड-19 च्या खबरदारीचा डोस घेतला आहे. आम्ही विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना खबरदारीचा डोस घेण्याचे आवाहन करतो. हा डोस अनिवार्य असून त्यासाठी प्रत्येकाला मार्गदर्शन केले आहे.”
बैठकीनंतर केंद्रिय मंत्री मनसुख मांडविया यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून पोस्ट करताना म्हणाले, “काही देशांमध्ये कोविड- 19 ची वाढती प्रकरणे पाहता तज्ञ आणि उच्चाधिकार्याबरोबर बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. कोविड अद्याप संपलेला नाही. आम्ही आरोग्यविषयक संबंधितांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून कोणत्याही परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यास तयार आहोत.” असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
Previous Articleकोल्हापुरच्या व्यावसायिकाला पुणेरी भामट्याने गंडवले
Next Article चीन सीमेवर तैनात होणार ‘प्रलय’ क्षेपणास्त्र









