Leopard Attack : शाहुवाडी तालुक्यातील उदगिरी पैकी केदारलिंगवाडीच्या हद्दीत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मुलगी ठार झाली. मनीषा बाबाजी डोईफोडे (वय 10) असे मृत मुलीचे नाव आहे.ही घटना बुधवारी (ता. 21) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.बिबट्यामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
शाहूवाडी तालुक्यातील पुसाळे हा परिसर चांदोली अभयारण्यापासून जवळच असल्यामुळे याठिकाणी बिबट्यांचा वावर सतत असतो. आज सकाळी मनिषा डोईफोडे आणि तिची आई जनावरांना चरण्यासाठी घेऊन गेल्या होत्या. जनावरांच्या मागे असलेल्या मनीषाला बिबट्याने झडप मारून पकडले.काही अंतर पुढे गेल्यावर मुलीचा आवाज येत नसल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले.आईने मुलीचा शोध सुरू केल्यानंतर काही अंतर मागे गवतात मुलीला ओढून नेणारा बिबट्या दिसला.आरडाओरडा करताच बिबट्या जंगलात पळून गेला.मात्र, या हल्ल्यात मुलीचा जागीच मृत्यू झाला.
Previous Articleसंजय राऊत हा पिसाळलेला कुत्रा; बांगरांची जीभ घसरली
Next Article मादिग समाजातर्फे सुवर्णसौध समोर निदर्शने









