ऑनलाईन टीम / तरुण भारत :
एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरुन पायउतार होण्याची घोषणा केली आहे. पण त्यांनी त्यासाठी एक अट घातली आहे. मस्क यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “मी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरचं सीईओ पद सांभाळण्यासाठी पात्र असा मूर्ख व्यक्ती सापडला की मी लगेच राजीनामा देईन. त्यानंतर मी फक्त सॉफ्टवेअर चालवेन आणि सर्व्हर टीमच्या कामकाजावर लक्ष ठेवेन.”
आता मस्क यांच्या या ट्विटचा नेमका अर्थ काय? याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मस्क यांनी ट्विटरवर पोल घेत नेटकऱ्यांना विचारलं होतं की, ‘मी ट्वटिरच्या सीईओ पदाचा राजीनामा द्यावा का? तुम्ही सांगाल तसं मी करेन.’ मस्क यांच्या या ट्विटमुळे मोठी खळबळ माजली होती. या पोलमध्ये 57.5 टक्के ट्विटर युजर्सने यावर ‘हो’ हा कौल दिला. हा निकाल मान्य करत मस्क यांनी पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
अधिक वाचा : पुण्यात 10 ते 14 जानेवारीदरम्यान रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार