क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित 14 वर्षाखालील मुलांच्या युजी चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी केएलई अ व ब, महिला विद्यालय, केएलएस व संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजय मिळविला. सुमित भोसले, आरुष कुलकर्णी, सुरेंद्र पाटील, निधी पाटील यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
जिमखाना मैदानावर स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे युनियन जिमखानाचे उपाध्यक्ष संजय पोतदार यांच्या हस्ते यष्टीचे पूजन करुन करण्यात आले. यावेळी जिमखाना सचिव प्रसन्न सुंठणकर, मिलिंद चव्हाण, सचिन साळुंखे, ताहीर सराफ, महांतेश देसाई, प्रमोद पालेकर, परशराम पाटील, अनिल गवी आदी मान्यवर उपस्थित होते.
पहिला सामन्यात केएलई ब संघाने ज्ञानप्रबोधन मंदिर संघाचा 30 धावाने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना केएलई संघाने 25 षटकात 6 गडी बाद 130 धावा केल्या. त्यात आरुष कुलकर्णी 51 धावा केल्या. ज्ञानप्रबोधनतर्फे आयुष अन्वेकर 2 गडी बाद केले.प्रत्युत्तरादाखल ज्ञानप्रबोधन संघाचा डाव 20.1 षटकात सर्व गडी बाद 100 धावात आटोपला. त्यात सुजल गोरल 32 धावा केल्या. केएलईतर्फे मोहम्मद हमजाने 3 गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात महिला विद्यालय संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 9 बाद 156 धावा केल्या. त्यात यश चव्हाणने 34, अथर्व नाकाडे व निधी पाटील यांनी प्रत्येकी 28 धावा केल्या.
प्रत्युत्तरादाखल वनिता विद्यालय संघाचा डाव 16.1 षटकात 95 धावात आटोपला. त्यात झोया काजी 28 धावा केल्या. अथर्व बेळगावकर 3 गडी बाद केले.
तिसरा सामन्यात केएसएस संघाने प्रथम फलंदाजी करताना 22 षटकात 8 बाद 117 धावा केल्या. सुरेंद्र पाटील 54 धावा केल्या. ज्ञानप्रबोधनतर्फे सुजल गोरलने 3 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल ज्ञानप्रबोधन संघाचा डाव 17.3 षटकात 85 धावत आटोपला. केएलएसतर्फे सुरेंद्र पाटीलने 4 गडी बाद केले.
चौथ्या सामन्यात महिला विद्यालय संघाने 17.4 षटकात सर्व गडी बाद 74 धावा केल्या. केएलई अ तर्फे सुमित भोसलेने 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल केएलई संघाने 12.4 षटकात 3 गडी बाद 77 धावा करुन सामना 7 गड्यांनी जिंकला.









