अमृतसर
पंजाबी गायक जॅजी-बीचे ट्विटर अकौंट निलंबित करण्यात आले आहे. मंगळवार सकाळपासून त्याच्या अकौंटवर भारतात बंदी घालण्यात आल्याची नोटीस दिसून येत आहे. विशेष म्हणजे जॅजी-बीचे अकौंट ट्विटरकडून व्हेरिफाय होते. जॅजी-बी हा शेतकरी आंदोलनादरम्यान अत्यंत सक्रीय होता. कायदेशीर नोटीसमुळे जॅजी-बी याच्या ट्विटर अकौंटवर कारवाई करण्यात आली आहे. जॅजी-बी याने बॉलिवूडमध्येही अनेक गाणी गायिली आहेत.









