राष्ट्रीय काँग्रेसने गड राखला; जुन्या पॅनेलमधील चौघांसह नविन १३ चेहऱ्यांना मिळाली संधी
वार्ताहर : कळंबा
करवीर तालुक्यातील कळंबा ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसच्या सतेज पाटील गटाने सलग तिसऱ्यांदा बाजी मारली आहे. पाटील गटांतर्गंत झालेल्या या निवडणुकीत सत्ताधारी गटातील चौघांना मतदारांनी पुन्हा संधी दिली आहे. तर १३ नवीन चेहरे आता ग्रामपंचायतींच्या सत्ताकारणात दिसणार आहेत.
कळंबा ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी निवडणूक लागली होती. सरपंचपदी सुमन गुरव यांची बिनविरोध निवड झाली, पण अन्य जागांसाठी गटांतर्गत पॅनेलमध्ये निवडणूक लागली. या निवडणुकीत वॉर्ड १ मधून दीपक तिवले, छाया भवड, वॉर्ड २ मधून रोहित मिरजे, पुनम जाधव, रोहीत जगताप, वॉर्ड ३ मधून संदीप पाटील, स्नेहल जाधव, वॉर्ड ४ मधून विकास पोवार बावडेकर, मीना गौंड, नितेश उर्फ सोनल शिंदे, वॉर्ड ५ मधून स्वरूप पाटील, दीपाली रोंपळकर, वॉर्ड ६ मधून उदय जाधव विजयी झाले. यापूर्वी वैशाली टिपुगडे, आशा टिपुगडे, भाग्यश्री पाटोळे, संगीता माने यांची बिनविरोध निवड झाली आहे. गतवर्षी सागर भोगम यांनी विकासकामे करत सतेज पाटील गटाचे ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखले होते. आता भविष्यात येथेही त्यांची भुमिका महत्वाची ठरणार आहे. वॉर्ड २ मध्ये सर्वाधिक चूरस होती. तेथे १३९० मतदान होते. विजयी उमेदवार रोहीत मिरजे अवघ्या ५० मतांनी विजयी झाले. त्यांना ५९१ मते मिळाली. सर्वात कमी मतदान वॉर्ड ६ मध्ये झाले होते. येथे विजयी उदय जाधव यांना ४८३ मते मिळाली तर पराभूत झालेल्यांना शंभरपेक्षा कमी मते मिळाली आहेत.









