Gram Panchayat Election Result 2022 : सांगली जिल्ह्यातील 416 ग्रामपंचायत साठी मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ झाला. सकाळपासूनच उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी केंद्रावर गर्दी केली. आपलाच नेता निवडून येणार या उत्साहात कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण सुरु केली. सांगली जिल्ह्यात एकूणच ग्रामपंचायत निवडणूक निकाल वातावरण नेमके काय आहे जाणून घेऊया या छायाचित्रणाच्या माध्यमातून ..


जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या आणि दिग्गज नेत्यांनी प्रतिष्ठापनाला लावलेल्या बेडग ग्रामपंचायतचा निकाल हाती आला असून तेथे भाजप पुरस्कृत उमेश पाटील गटाने पाच सदस्य आणि एक लोकनियुक्त सरपंच पदावर बाजी मारली. लोकनियुक्त सरपंच म्हणून उमेश पाटील विजयी झाले आहेत. विरोधी पारसू नागरगोजे गटाचे नऊ सदस्य निवडून आले. बापूसाहेब बुरसे गटाला दोन जागा मिळाल्या.










