सांगली जिल्ह्यात आज 416 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. ही मतदानप्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली असून कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. जिल्ह्यात यापूर्वीच 29 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत तर 38 गावातील सरपंच निवडणूक बिनविरोध झाली आहे. तर एकूण 5 गावातील निवडणुका आयोगाने ओबीसी आरक्षणसाठी थांबवली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणानी आपले काम चोख आणि शांततेत पार पडले.
राज्याचे माझी राज्यमंत्री मा आ डॉ विश्वजीत कदम यांनी सोनसळ येथे मतदानाचा हक्क बजावला


ताकारी येथील अपघात ग्रस्त मतदार निलेश अर्जुन हत्तेकर यांनी व्हीलचेर वरून येऊन मतदान केले

बोरगाव येथील मोहनराव पतंगराव पाटील विद्यालयातील मतदान केंद्रावर मतदारांची रांग

माजी जि. प. अध्यक्ष देवराज पाटील यांनी आपल्या गावी कासेगाव ता. वाळवा येथे सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.

नवेखेड येथील जिल्हा परिषद शाळेत मतदानाचा हक्क बजावताना महिला वर्ग

कडेपूर ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुक सन 2022 साठी कडेपूर येथे सांगली जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संग्राम देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावला.

आ. विक्रम सावंत यांनी सुसलाद या त्यांच्या गावी मतदानाचा हक्क बजावला

जुनेखेड येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर मतदारांची रांग








