जत, प्रतिनिधी
Gram Panchayat Election 2022 : मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा,यासाठी सरकार एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करून ग्रामीण पातळीवर जनजागृतीची मोहीम राबवत आहे.याचा युद्धपातळीवर प्रचार व प्रसार करत आहे.मात्र,याच मतदानाला जत तालुक्यातील 110 होमगार्ड मतदानापासून वंचित राहणार आहेत. मुदतीपूर्व पोस्टल मतदानसाठी अर्ज दाखल न झाल्याने हे सर्व मतदार मतदान करू शकणार नाहीत,असे तहसील प्रशासनाने सांगितले.
निवडणूक विभागाकडून तालुक्यात 81 पैकी 78 ग्रामपंचायतीसाठी दि.18 डिसेंबर रोजी मतदान प्रकिया राबविली जात आहे.ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडवी यासाठी तालुक्यात 21 अधिकारी, 300 पोलिस कर्मचारी व 150 होमगार्ड सज्ज झाले आहेत.
दरम्यान,या निवडणूक प्रक्रियेत सरकारी कर्तव्य बजावणाऱ्या यंत्रणाना पोस्टल मतदान बजावण्याचा हक्क घटनेने दिला आहे. तो प्रत्येकाने बाजावावा याची जबाबदारी निवडणूक विभाग घेत असतो.मात्र,या प्रक्रियेला जत तालुक्यातील 110 होमगार्ड मुकणार आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








