विविधतेतून एकता दाखवणारा देश म्हणजे भारत, पण इथे कधी-कधी सीमावाद पेटतो. कर्नाटक-महाराष्ट्र, महाराष्ट्र-तेलंगणा, कर्नाटक-केरळ असे वाद पाहायला मिळतात. पण इथे दोन सीमांना लागून एक घर आहे, याच्या ४ खोल्या महाराष्ट्रात आणि ४ तेलंगणात आहेत. हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल.
होय, महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर महाराजगुडा गाव आहे. या गावातील पवार कुटुंबीयांच्या घरात तेरा सदस्य राहतात. त्यांचे स्वयंपाकघर तेलंगणात आहे, तर हॉल महाराष्ट्रात आहे. 8 खोल्यांपैकी 4खोल्या महाराष्ट्रात आणि 4 घरे तेलंगणात आहेत. या घराचे १९६९ मध्ये झालेल्या समीक्षेत विभाजन झाले आहे. रेषा काढून ४ खोल्या महाराष्ट्रात आणि ४ खोल्या तेलंगणात समाविष्ट केल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने महाराजगुडासह १४ गावांचा महाराष्ट्रात समावेश करण्याचे आदेश दिले असले, तरी तेलंगणाचा दावा आहे की, ती आपल्या राज्याची आहे. मात्र त्यामुळे त्यांना काहीच फरक पडत नसल्याचे पवार कुटुंबीयांचे म्हणणे आहे.