बिहार विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानसभेत विरोधी पक्षाच्या भाजपसह विरोधी आमदारांनी राडा घातला. दारूमुळे झालेल्या मृत्यू झालेल्या लोकांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीवरून हा गदारोळ झाला.
बिहारमधील सारणमध्ये बनावट दारूमुळे आजपर्यंत 57 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय कुमार सिन्हा यांनी बनावट दारूमुळे होणाऱ्या मृत्यूंचा मुद्दा उपस्थित करून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे पीडीत लोकांच्या कुटुंबियांकडे नुकसान भरपाईची मागणी करून सभागृहात गोंधळ घातला.
दरम्यान, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सभागृहात बोलण्यास सुरुवात करताच सभागृहात विरोधी आमदारांनी खुर्च्या फोडून गोंधळ घातला. त्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा विधानसभेत संयम सुटला. आणि त्यांनी दारूमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांना नुकसान भरपाई नाकारली.त्यानंतर सभागृहाचे कामकाज साडेबारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.