प्रतिनिधी / बेळगावात : आज दि. १६ रोजी पोलीस विभागातर्फे प्रॉपर्टी रिटर्न परेडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी घरफोडी प्रकरणातील आरोपींकडून जप्त केलेल्या ऐवज त्यांच्या हक्काच्या मालकांना परत करण्यात आला.
आयजीपी सतीशकुमार यांच्या मुख्य उपस्थितीत आज बेळगावात पोलीस विभागातर्फे प्रॉपर्टी रिटर्न परेड पार पडला. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी दरवर्षी डिसेंबर महिन्यात ‘गुन्हे नियंत्रण मास’ आयोजित केला जातो. यातून जनतेमध्ये जनजागृती करण्यात येते.
यावेळी 201 प्रकरणे उघड झाली असून 324 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून साडेसतरा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या वस्तू मूळ मालकांना परत करण्यात आल्या आहेत.
या वेळी आयजीपी सतीशकुमार म्हणाले, मोबाईल सीसीटीव्ही तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोपीची लगेच ओळख पटू शकते. सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यास प्राधान्य दिले जात आहेत.
या वेळी शहर एस पी संजीव पाटील यांच्यासमवेत इतर अधिकारी उपस्थित होते.