प्रतिनिधी/ बेळगाव
इनरव्हिल क्लबच्या जिल्हा अध्यक्षा महानंदा चंदरगी यांनी गुऊवारी आराधना विशेष मुलांच्या शाळेला सदिच्छा भेट दिली. दरम्यान शाळेच्या आवारात क्लबकडून बसविण्यात आलेल्या पेव्हर्सची पाहणी देखील केली. या कामाच्या प्रगतीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी मुख्याध्यापक गजानन सुतार यांनी उपस्थितांचे स्वागत करून शाळेने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांची प्रगती पाहून मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. इनरव्हिल क्लबने हॅपी स्कूल योजनेतंर्गत आराधना शाळेसाठी वेळोवेळी मोठे सहकार्य केले आहे.
याप्रसंगी इनरव्हिलच्या माजी अध्यक्षा वासंती आचार्य, सचिव मंजिरी पाटील, आजी अध्यक्षा शालिनी चौगुले, सचिव पुष्पांजली मुक्कण्णावर यांच्यासह शिक्षक रशीद भाई, मारूती कुंभार, किशोरी जुवेकर, अश्विनी पवार, नंदा लोहार व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन व्दारकाताई पाटील यांनी केले.









