युवा समितीचा निर्धार
बेळगाव / प्रतिनिधी
मराठी भाषिकांची अस्मिता दाखवून देण्यासाठी सोमवार दि. 19 रोजी महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सीमाभागातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा निर्धार म. ए. युवा समितीच्यावतीने आयोजित बैठकीत करण्यात आला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीचा आढावा घेण्यात आला. याचबरोबर दिवंगत मान्यवर व कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. व्हॅक्सिन डेपो येथे होणाऱ्या महामेळाव्याला प्रत्येक गावातून युवक सहभागी होतील, यासाठी जागृती करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी कार्याध्यक्ष सूरज कुडुचकर, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सचिन केळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, खजिनदार मनोहर हुंदरे, विनायक कावळे, वासू सामजी, राजू कदम, प्रवीण रेडेकर, संतोष कृष्णाचे, अश्वजीत चौधरी, सिद्धार्थ चौगुले, आनंद पाटील, प्रतीक पाटील यांच्यासह युवा कार्यकर्ते उपस्थित होते.









