ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची महत्वकांक्षी योजना असलेल्या जनधन योजनेतील जवळपास 11 लाख बँक खाती आता बंद करण्यात येणार आहेत. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी राज्यसभेत यासंदर्भात माहिती दिली.
गरीब, दुर्बल आणि ग्रामीण भागातील घटकाला बँकिंग सेवा मिळावी, यासाठी पंतप्रधान मोदींनी जनधन योजना सुरू केली होती. सध्या देशभरात जनधन योजनेची 47.57 कोटी बँक खाती आहेत. यापैकी 38.19 कोटी खाती सध्या वापरात आहेत. तर 10.79 लाख नक्कल खाती आहेत. संबंधित यंत्रणेने चुकीची प्रक्रिया राबवत ही खाती उघडली होती. ही चूक आता केंद्र सरकारच्या लक्षात आली आहे. त्यामुळे अनेक बँकांमधील ही खाती आता बंद करण्यात येणार आहेत.
अधिक वाचा : …म्हणून त्याने पवारांना दिली जीवे मारण्याची धमकी
जर एखाद्या ग्राहकाची दोन जनधन खाती असतील, तर त्यापैकी एक डुप्लिकेट खाते बंद होणार आहे. या खात्यातंर्गत ग्राहकांना एक लाख रुपयांचा दुर्घटना विमा संरक्षण देण्यात येते. तसेच 30,000 रुपयांचा जनरल इन्शुरन्स असतो. या खात्यात कमीतकमी रक्कम ठेवण्याची गरज नसते. हे खाते सरकारकडून बंद होण्यापूर्वी दोन खाती असलेले ग्राहक हे खाते बंद करु शकतात.









