अऊणाचल प्रदेशसंबंधी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे लोकसभेत वक्तव्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अऊणाचल प्रदेशात चीनने केलेला घुसखोरीचा प्रयत्न भारताच्या सजग आणि सावध सैनिकांनी हाणून पाडला आहे, असे वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत केले आहे. 9 डिसेंबरला चीनच्या काही सैनिकांनी नियंत्रणरेषा ओलांडून भारताच्या क्षेत्रात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, आपल्या सैनिकांनी सीमेचे संरक्षण अत्यंत सजगपणे केले. त्यामुळे चिनी सैनिकांना माघार घ्यावी लागली, असे राजनाथ सिंह यांनी लोकसभेत स्पष्ट केले.
9 डिसेंबरला अऊणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीकच्या यांगत्से या तावांग क्षेत्रातील काही भागात चीनच्या सैनिकांनी एकतर्फी नियंत्रणरेषेवरील यथास्थिती बिघडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपल्या सैनिकांनी चीनला चोख आणि खंबीर प्रत्युत्तर दिले. यावेळी भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये हातघाईची झटापट झाली. भारताच्या सैनिकांनी चीनच्या सैनिकांना सीमारेषा ओलांडण्यापासून यशस्वीरित्या रोखले. आपले काही सैनिक या झटापटीत जखमी झाले आहेत. मात्र, त्यांच्या कडव्या प्रतिकारामुळे चिनी सैनिकांची मात्रा चालली नाही आणि त्यांना परत त्यांच्या बराकींमध्ये जावे लागले. चीनचेही अनेक सैनिक या झटापटीत जखमी झाले आहेत. मात्र, या झटापटीत कोणताही भारतीय सैनिक धारातीर्थी पडला नाही,
किंवा गंभीररित्या जखमीही झालेला नाही, असे राजनाथसिंग यांनी लोकसभेत आपल्या वक्तव्यात पुढे स्पष्ट केले.
वेळेवर प्रतिकार
भारतीय कमांडो सैनिकांनी वेळीच चीनच्या सैनिकांना रोखल्यामुळे चीनचे सैनिक त्यांच्या मूळ जागी परतले. या घटनेचा पाठपुरावा करताना या भागातील स्थानिक भारतीय कमांडरने 11 डिसेंबरला ध्वज बैठक आयोजित केली. या बैठकीत चीनला पुन्हा अशी आगळीक करू नका, असा इशारा देण्यात आला. तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर यथास्थिती बिघडविण्याचा प्रयत्नही करू नका, असेही त्यांना बजावण्यात आले. चीनकडे मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून हा विषय उपस्थित करण्यात आला आहे, अशीही माहिती राजनाथसिंग यांनी निवेदनाद्वारे दिली.
विमाने धाडली ?
तावांग भागात चीनच्या सैनिकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचवेळी चीनचे काही ड्रोन्सही भारताच्या वायुक्षेत्रात प्रवेशले होते. त्यांना हाकलून देण्यासाठी भारताच्या वायुदलाने आपली काहीं विमाने धाडली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. वायुदलाच्या काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही माहिती देण्यात आली असेही सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, या वृत्ताची अधिकृतता संशयास्पद असल्याचेही दिसून येते. राजनाथसिंग यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्यात या संबंधी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, विमाने धाडल्याचे वृत्त मात्र पसरलेले आहे. वायुदल किंवा भूदलानेही यासंबंधी वक्तव्य केलेले नाही.
राजीव गांधी न्यास मुद्दा उपस्थित
केंद्र सरकारने काँग्रेसच्या काळात स्थापन झालेल्या राजीव गांधी न्यासाची अनुमती काढून घेतली, म्हणून काँग्रेसने अऊणाचल प्रदेशचे प्रकरण उकऊन काढले, असा गंभीर आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. राजीव गांधी न्यासाला चीनच्या दूतावासाकडून 1.35 कोटी ऊपयांची देणगी मिळालेली होती. तथापि ती कायदेशीर नव्हती. म्हणून न्यासाची मान्यता काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा राग म्हणून काँग्रेसने अऊणाचल प्रदेश प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. तथापि, आपल्या शूर सैनिकांनी तावांग येथे चीनी सैनिकांना सीमारेषा ओलांडू दिली नाही. शेवटी त्यांना रेषेवऊनच त्यांच्या बराकींमध्ये परत जावे लागले. आपल्या सैनिकांची ही कामगिरी कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन अमित शहा यांनी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना केले. जो पर्यंत नरेंद्र मोदी यांचे सरकार भारतात आहे, तो पर्यंत भारताची अणुएवढीही भूमी गमावली जाणार नाही, असेही आत्मविश्वासपूर्वक प्रतिपादन शहा यांनी केले.
नेहऊंच्या घातक चुकांचे परिणाम
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहऊ यांच्या चीनवरील प्रेमापोटी भारताची कोंडी झाली होती. नेहऊंमुळेच चीनला संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश मिळाला आणि चीन सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य झाला. खरे पाहता हे स्थान भारताला मिळणार होते. नेहऊंच्या घोडचुकांमुळेच आज चीन शिरजोर झाला आहे. याचे उत्तरदायित्व नेहऊंचेच आहे. नेहऊंच्या चुकांमुळे भारताचा 1962 च्या युद्धात चीनकडून अपमानास्पद पराभव झाला. चीनने भारताचा हजारो चौरस किलोमीटरचा भूभाग बळकावला. 2006 मध्ये काँग्रेसचेच राज्य असताना चीनने संपूर्ण अऊणाचल प्रदेशवर आपला दावा सांगितला. चीनची मुजोरी वाढण्यासाठी नेहऊ आणि काँग्रेस जबाबदार आहे, अशी जहाल टीका भाजप प्रववक्ते संबित पात्रा यांनी केली.

चीनला चोख प्रत्युत्तर
- भारतीय सैनिकांच्या शौर्यामुळे
- चीनचे घातक मनसुबे उद्ध्वस्त
- राजनाथ सिंह यांचे लोकसभेत निवेदन, विरोधकांकडून गोंधळ
- नेहऊंच्या अक्षम्य चुकांमुळे पूर्वी भारताने मोठा भूभाग गमावला









