Green and white board provided to Rani Laxmibai Girls’ School
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य
राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरदचंद्र पवार यांच्या 82 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ले शहर राष्ट्रवादीतर्फे राणी लक्ष्मीबाई कन्याशाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमांत शाळेतील मुलांच्या शिक्षणासाठी अत्यावश्यक असलेले, खडू आणि स्केच पेन यांचा वापर करून शिक्षण देता येणारे नवीन टेक्नीकचे ग्रीन व व्हाईट दोन बोर्ड राष्ट्रवादीच्या प्रदेश महिला सचिव सौ. नम्रता कुबल यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका मुग्धा कनयाळकर यांचेकडे प्रदान केले.
वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पक्षाचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष तथा खासदारा शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ले शहर कुबलवाडा येथील राणी लक्ष्मीबाई कन्याशाळा या सुमारे 150 वर्षे पूर्ण झालेल्या शाळेत वाढदिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला. या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी असलेली गरज लक्षात घेऊन खडू आणि स्केच पेन यांचा वापर करून शिक्षण देता येणारे नवीन टेक्नीकचे ग्रीन व व्हाईट असे दोन बोर्ड (शाळेतील आधुनिक फळे) प्रदेश महिला सचिव नम्रता कुबल व जिल्हा सदस्य नितीन कुबल यांनी पुरस्कृत बोर्ड या शाळेस प्रदान करण्यात आले. तसेच यावेळी उपस्थित शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बिस्कीट पुड्यांचे वाटप करण्यातं आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांत अध्यक्षस्थानी सौ. नम्रता कुबल, शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष सत्यवान साटेलकर, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. प्रज्ञा परब, जिल्हा सदस्य नितीन कुबल, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, माजी उपनगराध्यक्ष वामन कांबळे, शहर सचिव स्वप्निल रावळ, महिला शहर अध्यक्षा सौ. सुप्रिया परब, सुभाष तांडेल, शाळेच्या मुख्याध्यापिका मुग्धा कनयाळकर, शाळेच्या शिक्षिका नेहा गवाणकर, साची वेंगुर्लेकर, सुप्रिया बेहेरे , धनश्री हुले यांचा समावेश होता.