Spontaneous participation of women in yoga practice camp and yoga competition in Sawantwadi
११ डिसेंबर २०२२ रोजी पार पडली जगन्नाथराव भोसले उद्यानात स्पर्धा
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सावंतवाडीतील जगन्नाथराव भोसले उद्यान येथे ११ डिसेंबर २०२२ रोजी सकाळच्या सत्रात एकदिवसीय योगाभ्यास शिबिर व योगासन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या योगाभ्यास शिबिर व योगासन स्पर्धेसाठी लक्षणिय असा तब्बल ५० महिलांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेसाठी १०० सूर्यनमस्कार स्पर्धा व ऐच्छिक आसन स्पर्धा असे दोन वेगवेगळे विभाग ठेवण्यात आले होते.
सकाळी ७.०० ते ८.०० वाजेपर्यंत योगाभ्यास शिबिर आयोजित केले होते, व त्यानंतर ८.०० वाजल्यापासून ९.०० वाजेपर्यंत योगाभ्यास स्पर्धा ठेवण्यात आली होती. या स्पर्धेच्या पहिल्या विभागातील १०० सूर्यनमस्कार स्पर्धेत सौ.वैशाली कारेकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला तर द्वितीय क्रमांक कु.शिवानी औरादी व तृतीय क्रमांक सौ.नंदिनी राऊळ यांना मिळाला. स्पर्धेतील दुसऱ्या विभागात ऐच्छिक आसन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सौ.शीतल पास्ते, द्वितीय सौ.रुपाली तुळसकर तर तृतीय सौ.वैशाली कारेकर असे अनुक्रमे तीन क्रमांक देण्यात आले. त्याचबरोबर स्पर्धेसाठी उत्तेजनार्थ क्रमांक प्रथम सौ.शारदा गुरव, उत्तेजनार्थ द्वितीय कु.प्रदीप्ती कोटकर तर उत्तेजनार्थ तृतीय सौ.रेखा कुमठेकर यांनी प्राप्त केला. स्पर्धेतील विजेत्यांना आयोजक सौ.भूमी महेंद्र पटेकर, सौ. रेखा कुमठेकर, सौ.सारिका श्री. पुनाळेकर सौ.आदिती नाईक व सौ.मोहिनी मडगावकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण केले.
सावंतवाडी / प्रतिनिधी