वृत्तसंस्था/ चेतोग्राम
यजमान बांगलादेश आणि भारत यांच्यात येत्या बुधवारपासून येथे सुरू होणाऱया पहिल्या क्रिकेट कसोटीसाठी कर्णधार रोहित शर्मा जखमी झाल्याने तो या सामन्यात खेळू शकणार नाही. दरम्यान, के. एल. राहुलकडे संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. रोहित शर्माच्या जागी अभिमन्यू ईश्वरनचा संघात समावेश करण्यात आला आहे.
रोहित शर्माने या दुखापतीनंतर मुंबईतील एका तज्ञ डॉक्टरशी सल्ला घेतला. या दुखापतीवर वैद्यकीय इलाज सुरू असून त्याला या समस्येतून बरे होण्यासाठी काही दिवस लागतील, असे सांगण्यात आले. कदाचित दोन सामन्यांची कसोटी मालिका शर्माला हुकण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. भारतीय निवड समितीने जखमी रोहित शर्माच्या जागी अभिमन्यू ईश्वरन याची निवड केली आहे. त्याचप्रमाणे मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजा हे अद्याप दुखापतीतून पूर्ण बरे झाले नसल्याने ते या मालिकेत खेळू शकणार नाहीत. त्यांच्या जागी नवोदित वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आणि सौरभ कुमार यांचा संघात समावेश झाला आहे. डावखुरा गोलंदाज उनादकटलाही संघात स्थान देण्यात आले आहे.
भारतीय संघ- के. एल. राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, के. एस. भरत, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू ईश्वरन, नवदीप सैनी, सौरभ कुमार आणि जयदेव उनादकट.









