अचानक लागलेल्या आगीमुळे घराच्या छत आणि किराणा दुकानही जळून भस्मसात झाले. ही घटना खानापूर तालुक्यातील रामापूर येथे घडली आहे.
येथील मन्सूर यांच्या घराला आग लागली आहे. मन्सूर बॅटरी दुरुस्तीचे काम करायचे. यावेळी घरात 20 हून अधिक बॅटऱ्या होत्या. चार्जिंग करताना शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणी खानापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.