श्रीगंगानगर / वृत्तसंस्था
राजस्थानमधील श्रीगंगानगर जिह्यातील अनुपगढ सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी रेंजर्सनी शुक्रवारी शेतकरी आणि जवानांवर 6-7 राउंड गोळीबार केला. प्रत्युत्तरात भारतीय जवानांनी 18 राऊंड फायर केले. तथापि, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. गोळीबाराच्या घटनेनंतर बीएसएफने फ्लॅग मीटिंग आमंत्रित केली होती. श्रीगंगानगर जिह्यातील अनुपगड सेक्टरमध्ये ही बैठक घेण्याचे नियोजन केले जात असल्याचे बीएसएफ अधिकाऱयाने सांगितले.









