गोकुळ शिरगाव वार्ताहर
कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये मुख्य रस्त्यावर गुरुवार दिनांक 8 रोजी सकाळी आकरा वाजता ईनोवा कार व मोटरसायकल मध्ये भीषण अपघात झाला होता, यामधील पाच जणांच्या वर सीपीआरमध्ये व खाजगी दवाखान्यात उपचार सुरू .यामधील आज सोनू कुमार सुनील यादव (वय 22 )मूळ रा. गुरुमेला कटियारा बिहार, सध्या राहणार मेट्रो पार्क कागल हा आज मयत झाला . इतर जखमींच्या वर उपचार सुरू आहेत या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.
या अपघातामध्ये जखमी झालेले पंकज कुमार राहणार बिहार, सिद्धार्थ कांबळे (वय32) विचारे मळा कोल्हापूर’ पंकज निवृत्ती पाटील( व 24) रा. शिरोली दुमाला, किरण कृष्णा शंकर सनगर (वय 30 )रा. म्हाडा कॉलनी ,सुजित गोपी जांभेकर( वय 31 ) विचारे मळा कोल्हापूर ,इनोवा कारचा चालक सुजित गोपी जांभेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून यामध्ये वाहनांचे दोन लाखाच्या वर नुकसान झाले आहे. या घटनेची फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष तेलंग यांनी दिली आहे. तपास ठाणे अंमलदार कांबळे व साहायक फौजदार तिवढे करत आहेत.









