Special honor to Dashavatar drama owners participating in Dashavatari drama festival in Surangpani Vitthal Panchayat
ग्रामीण भागात लोकवस्तीपासून लांब निरव शांतता असलेल्या भागात प.पू. दादा पंडित यांनी परमेश्वरी संकेतानुसार व अध्यात्मिकतेच्या प्रचारासाठी तसेच भाविकांना मन:शांती लाभणाऱ्या अशा श्री विठ्ठल पंचायतन देवस्थानची केलेली निर्मीती हि एक सेवा आहे. या ठिकाणी आलेल्या भाविकांना समाधान लाभते. भाविकांत अध्यात्मिकतेची प्रेरणा व देवभक्ती वाढविण्यासाठी या स्थळावर करीत असलेले उपक्रम याची खरी गरज आजच्या काळात आहे. असे प्रतिपादन मिरज-सांगली येथील समर्थ वेळणास्वामी मठाचे मठाधिपती प. पू. कौस्तुभबुवा रामदासी यांनी खानोली-सुरंगपाणी येथील दशावतार महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी केले.
खानोली-सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान या धार्मिक स्थळावर दत्तजयंती निमीत्त आयोजित केलेल्या नाटय़महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व दशावतारी नाटय़मंडळाच्या मालकांचा मिरज-सांगली येथील समर्थ वेळणास्वामी मठाचे मठाधिपती प. पू. कौस्तुभबुवा रामदासी यांच्या प्रमुख उपस्थितीत कलेश्वर दशावतार नाटय़मंडळातील कलाकार कै. शांती कलींगण यांच्या स्मरणार्थ शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व पुषगुच्छ देवून खास श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान कमिटीचे व्यवस्थापक प. पू. दादा पंडित यांनी गौरव केला.
वेंगुर्ले (वार्ताहर)-