वृत्तसंस्था/ बँकॉक
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे बुधवारपासून सुरू झालेल्या विश्व टूर फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेत अ गटातील पुरुष एकेरीच्या पहिल्याच सामन्यात भारताच्या बाराव्या मानांकित एच. एस. प्रणॉयला पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात जपानच्या नाराओकाने त्याचा पराभव केला.
अ गटातील झालेल्या या सामन्यात जपानच्या कोडाई नाराओकाने एच. एस. प्रणॉयचा 21-11, 9-21, 21-17 अशा गेम्समध्ये पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. हा सामना एक तास चालला होता. प्रणॉयचा या स्पर्धेतील पुढील सामना चीनचा लू ग्युयांग झूशी होणार आहे.









