वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या अँड्राईड वर्शन 2.0 या मोबाईल ऍपचा प्रारंभ केला आहे. बुधवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. या ऍपची आयओएस आवृत्ती पुढील आठवडय़ात येणार आहे. या ऍपच्या माध्यमातून विधिज्ञ आणि अधिवक्त्यांना सर्वोच्च न्यायालयाची कार्यवाही प्रत्यक्ष पाहता येणार आहे. कारवाई पाहण्यासाठी त्यांना या ऍपला लॉग ईन करावे लागणार आहे. या ऍपमुळे वकील तसेच पक्षकारांनाही लाभ होईल. सर्वोच्च न्यायालय आता आपल्या कामकाजात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक समावेश करणार असल्याची माहितीही सरन्यायाधीशांनी दिली.









