ऑनलाईन टीम / तरुण भारत :
‘AAP’ government in Delhi Municipal Corporation दिल्ली महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे भाजपची महापालिकेवरील 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे.
दिल्ली महापालिकेच्या 250 जागांसाठी 4 डिसेंबर रोजी मतदान झालं होतं. 250 जागांसाठी एकूण 1349 उमेदवार रिंगणात होते. आज मतमोजणी पार पडली. त्यामध्ये ‘आप’ला 250 पैकी 134 जागा, भाजपला 104 तर काँग्रेसला 9 जागा जिंकता आल्या. तीन जागांवर अपक्ष विजयी झाले आहेत. दिल्ली महापालिकेवर गेल्या 15 वर्षांपासून भाजपची सत्ता होती. यंदाच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेस या तीन पक्षांमध्ये मुख्य लढत होती. मात्र, यंदा आम आदमी पक्षाला दिल्ली महापालिकेची सत्ता काबीज करण्यात यश आलं.
अधिक वाचा : वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मीराबाई चानूला ‘रौप्य’
भाजपने या निवडणुकीत पसमांदा कार्ड खेळत 4 चार पसमांदा मुस्लिमांना उमेदवारी दिली होती. पण त्यापैकी एकही उमेदवार या निवडणुकीत विजयी झाला नाही. दरम्यान, 2017 मध्ये भाजपने तत्कालीन 270 पैकी 181 जागा जिंकल्या होत्या. तेव्हा ‘आप’ला केवळ 48 तर काँग्रेसला 30 जागा मिळवता आल्या होत्या.