Minister Ramdas Athawal : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakre ) आणि वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यात सोमवारी चर्चा झाली. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना-वंचित आघाडी यांच्या युतीबाबत त्यांनी पहीली महत्वाची बैठक घेतली. या घडामोडीनंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Minister Ramdas Athawal) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे (RPI) अध्यक्ष आणि केंद्रिय मंत्री रामदास आठवले म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येण्याऱ्या शक्तीला मी भीमशक्ती मानत नाही. कारण, सगळी भीमशक्ती माझ्याबरोबर असून, प्रकाश आंबेडकरांकडील शक्ती ही वंचित शक्ती आहे. परंतु, मी सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर असल्याने शिवशक्ती आणि भीमशक्ती याठिकाणी आहे. त्यामुळे दुसऱ्या शिवशक्ती आणि भीमशक्तीचा विषयच येत नाही,” असे रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








