एका चार्जवर धावणार 805 किलोमीटरचे अंतर ः 1 कोटी 20 लाख किंमत
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
एलॉन मस्क यांच्या मालकीच्या टेस्लाचा पहिला वहिला इलेक्ट्रिक ‘सेमी’ ट्रक नुकताच लाँच करण्यात आला आहे. डिझेल इंधनापेक्षा तीन पट शक्तीशाली ट्रक असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
20 सेकंदात ट्रक 0 ते 60 कि. मी. प्रति तास इतका वेग घेऊ शकतो तर 805 किलोमीटरचे अंतर ट्रक कापू शकतो. याची किंमत 1 कोटी 21 लाख रुपये इतकी आहे. कंपनीच्या गीगा फॅक्टरीत तयार झालेला पहिला ट्रक पेप्सी कंपनीला देण्यात आला आहे. 2017 डिसेंबरमध्ये पेप्सीने 100 ट्रकची ऑर्डर टेस्ला कंपनीला दिली आहे. या ट्रकची डिलिव्हरी 2019 मध्ये कोरोनामुळे रखडली होती.
भविष्यातील ट्रक
एलॉन मस्कने ‘सेमी’ ट्रकला भविष्यातील ट्रक म्हणून सादर केले आहे. कार चालविण्यासारखाच अनुभव यातून मिळतो, असेही मस्क यांनी म्हटले आहे.









