चिक्कोडी – लहान भावानेच मोठ्या भावाचा धारदार शस्त्राने खून करून पोलिसांना शरण गेल्याची खळबळजनक घटना चिक्कोडी येथील उमराणी घाटानजीक घडली आहे. अकबर शेख ( वय 40) असे खून झालेल्याचे व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी अमजद शेख ( वय 38) ला अटक करण्यात आली आहे. अकबर शेख आणि अमजद शेख हे दोघेपण सख्खे भाऊ होते. अकबराचे कब्बूर येथे बॅटरीचे दुकान आहे. काल सायंकाळी 4 च्या दरम्यान अकबर कब्बूरहून चिक्कोडीकडे दुचाकीवरून जात होता. यावेळी अमजदने त्याचा आपल्या कारने पाठलाग करून अडवले आणि अचानकच अमजदने धारदार शस्त्राने अकबर यांच्यावर हल्ला करून निर्घृणपणे खून केला .या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. त्यानंतर आरोपी अमजद थेट चिक्कोडी पोलिस स्थानकात येऊन हजर झाला.
घटनास्थळी चिक्कोडीचे सीपीआय आर. आर. पाटील, पीएसआय यमनप्पा मांग, घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह चिक्कोडी सरकारी इस्पितळात हलविण्यात आला आहे . पोलीस चौकशीच्यावेळी धक्कादायक बाब समोर आली असून, बायको बरोबर अनैतिक संबंध ठेवल्यानेच हे कृत्य केल्याची माहिती मिळाली . चिक्कोडी पोलिसांत या प्रकरणाची नोंद झाली असून पोलीस अधिक तपस करीत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









