चोर्ला घाटात आणखी एक अपघात घडला असून दोन जण जागीच ठार झाले आहेत.
गोवा-बेळगांव राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली असून, भरधाव वेगात असलेली कार एका खोल दरीत कोसळली . या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर ४ जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . त्या पैकी सुधीर कुमार आणि नूरशेख मूळचे महाराष्ट्र असे मृतांची ओळख पटली आहे.