वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नुकत्याच झालेल्या 65 व्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशीप स्पर्धेत पुरुषांच्या 10 मी. एअर रायफल प्रकारात अर्जुन बबुता तर पुरुषांच्या ट्रप नेमबाजीत विवान कपूर हे नवे राष्ट्रीय विजेते ठरले आहेत.
पंजाबच्या अर्जुन बबुताने पुरुषांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत आसामच्या हजारिकाचा 16-8 असा पराभव करत सुवर्णपदक मिळविले. सदर स्पर्धा थिरुवनंतपुरममध्ये घेतली गेली. पुरुषांच्या ट्रप नेमबाजीत राजस्थानच्या विवान कपूरने तामिळनाडूच्या टी. पृथ्वीराज 31-27 असा पराभव करत सुवर्णपदक मिळविले. युवा पुरुषांच्या एअर रायफल नेमबाजीत पश्चिम बंगालचा नेमबाज अभिनव शॉने कातकरचा 16-14 असा पराभव करून सुवर्णपदक मिळविले.









