काबूल / वृत्तसंस्था
अफगाणिस्तानच्या समगान प्रांतात बुधवारी एका शाळेवर दहशतवादी हल्ला झाला. प्राथमिक माहितीनुसार या हल्ल्यात 10 मुलांसह 16 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी सरकारी इस्पितळाकडून देण्यात आली. स्थानिक प्रशासनाने दहशतवादी हल्ल्याला दुजोरा दिला आहे. तसेच 27 जखमींवर उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. या हल्ल्यानंतर शहरातील सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत स्फोटाची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतली नव्हती. तसेच संबंधित हल्लेखोरांनाही अटक करण्यात आलेली नाही.









