Maha Youth for Climate Action, a one-day workshop concluded in Malvan
बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण तर्फे युनिसेफ, मुंबई आणि पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महा युथ फॉर क्लायमेट अँक्शन ही एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी युनीसेफ च्या कन्सल्टंट श्रीम. प्रियांका शेंगडे, पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणे कार्यशाळा प्रमुख श्री. अवधूत अभ्यंकर, टीम मेंबर्स कृणाल जयस्वाल, मंगेश निकम, MYCA चे मालवण प्रतिनिधी श्री.संजय वराडकर, सेवांगणचे व्यवस्थापक श्री. संजय आचरेकर हे उपस्थित होते. तसेच सोसायटी ऑफ सॅक्रेड हार्ट या संस्थेच्या श्रीम. रिटा पिंटो यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला मनोजकुमार गिरकर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. संस्थेचे कार्यवाह श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी सर्वांचे स्वागत करुन संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. या वेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी केले.
मालवण / प्रतिनिधी









