50 people donated blood at blood donation camp in Shiroda
सलग 24 व्यावर्षी सामाजिक कार्यकर्ते नितीन परब मित्रमंडळाचे आयेाजन
शिरोडा पंचक्रोशीतील सामाजिक कायकर्ते नितीन परब यांनी सलग 24 व्यावर्षी शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरास रक्तदात्यांकडून उlस्फुर्त प्रतिपाद लाभला. या रक्तदान शिबीरात 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिराडा येथील उपजिल्हा रूग्णालयात नितिन परब मित्र मंडळ व ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना गांधीचौक शिरोडा यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते योगेश प्रभू यांच्या हस्ते झाले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते नितीन परब मित्र मंडळ, सौ. निकिता परब व ऑटो रिक्षाचालक-मालक संघटना, गांधीचौक शिरोडा हे गरजू रुग्णांची गैरसोय होऊ नये याकरीता गेली 23 वर्षे चालक-मालक संघटना गांधीचौक शिरोडा हे संयुक्त रित्या हा उपक्रम राबवित आहेत. कोविडचा कालावधी सोडता सातत्याने असे उपक्रम राबवणारी हि मोजक्या संस्थापैकी नितीन परब मित्र मंडळ व ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना गांधीचौक शिरोडा यांचे नाव जिल्हयामध्ये अग्रक्रमाने घेतले जाते. एक आदर्शवंत उपक्रमाने जनतेची सेवा हे करीत आहेत. हे शिरोडा गावास भूषणावह आहे. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते योगेश प्रभू यांनी केले.
वेंगुर्ले (वार्ताहर)-









