Jagdish Kharade as President of Rameshwar Fisherman’s Association
उपाध्यक्षपदी हेमंत जोशी यांची निवड
दांडी आवार येथील श्री रामेश्वर मच्छीमार संस्था अध्यक्षपदी जगदीश खराडे तर उपाध्यक्षपदी हेमंत जोशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अजय हिर्लेकर, सचिव सतेजा वायंगणकर, संचालक पंकज सादये, जीवन भगत, संतोष ढोके, प्रवीण मेस्त, तुषार आचरेकर, दिलिप पराडकर, रवींद्र ढोके, मृणाली कोयंडे, अर्चना आचरेकर, दत्ता माणगावकर आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे जिल्हा नियोजन सदस्य हरी खोबरेकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगरसेविका सेजल परब, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर, श्रमिक मच्छीमार संघाचे बाबी जोगी, रुपेश प्रभू, पॕनेलप्रमुख अन्वय प्रभू व रश्मीन रोगे, मालवण मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष विकी चोपडेकर आदींनी अभिनंदन केले.
मालवण / प्रतिनिधी









