Gujarat Elections : आम आदमी पार्टीचे ( AAP ) अध्यक्ष अरविंद केजरीवाल (Arwind Kejriwal) यांच्या सुरतमधील रोड शोमध्ये दगडफेक झाली आहे. सुरतमध्ये (Surat) एका गल्लीमध्ये केजरीवाल यांची रॅली आली असता ही दगडफेक झाली असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा आपच्या नेत्याकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
या घटनेला केजरीवाल यांनी भाजपला (BJP) जबाबदार धरले आहे. “भाजपने गेल्या 27 वर्षात एकही काम केले नाही. राज्यात सर्वत्र महागाई, बेरोजगारी आहे. त्यांनी फक्त गुंडगिरी केली असून त्यांनी आमच्यावर दगडफेक केली. गेल्या 27 वर्षात काम केले असते तर आमच्यावर दगडफेक करण्याची वेळ आली नसती.” असे ते म्हणाले. एका माध्यमाशी बोलताना आपचे उमेदवार अल्पेश कथिरिया ( Alpesh Katharia) यांनी “भारतीय जनता पक्षाच्या गुंडांनी दगडफेक केला असून लोक केजरीवालांना फुले देत असताना भाजपचे गुंड दगडफेक करत आहेत” असे कथिरिया म्हणाले.
Previous Articleश्रद्धाची हत्या करणाऱ्या आफताबवर हल्ल्याचा प्रयत्न
Next Article सीमाप्रश्नी आम्ही सर्व पक्ष एकच









