ऑनलाईन टीम/तरुण भारत
Lockdown In China : चीनमध्ये (china) गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. मागील काही दिवसांत ३० हजाराहून अधिक नवीन कोरोना रुग्ण चीनमध्ये आढळले. त्यामुळं सरकारनं लॉकडाऊन (Lock Down) लावण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या टाळेबंदीला चीनमधील जनतेने विरोध केला असून लोक रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी आंदोलक आणि चीनी सरकार यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीत आतापर्यंत १० आंदोलकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. (china protest against covid lockdown demand to remove lockdown, 10 protesters killed)
चीनमध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चीनच्या प्रशासनाने लॉकडाऊन लागू केला आहे. मात्र, या लॉकडाऊनला चीनच्या जनतेने विरोध केला आहे. पुन्हा लॉकडाऊन नको यासाठी चीनच्या नागरिकांनी आंदोलन केले. विशेष म्हणजे या आंदोलनात १० जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
चीनमधील बीजिंगमध्ये गुरुवारपासून रविवारपर्यंत दररोज सुमारे ३० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. बहुतेक रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत. त्यामुळे चीन सरकारने पुन्हा एकदा झिरो कोविड धोरण लागू करत अनेक शहरांमध्ये कठोर निर्बंध आणि लॉकडाऊन लागू केला आहे.
शिवाय, राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या झिरो कोविड धोरणालाही देशात विरोध होऊ लागला आहे. लॉकडाऊन मागे घेण्याची मागणी करत लोक रस्त्यावर उतरले आहेत. नानजिंग आणि बीजिंगसह अनेक शहरांमधील विद्यापीठांमधील विद्यार्थी शांततापूर्ण निदर्शनांसाठी हातात कोरे कागद घेऊन दिसले. मात्र त्यानंतर आंदोलन तीव्र झालं या आंदोलनात १० जणांचा मृत्यू झाला.
या घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रविवारी एका दिवसात ४० हजार नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. देशात सलग चौथ्या दिवशी संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये शांघायसारख्या मोठ्या शहरांमध्ये प्रकरणांमध्ये वाढ झाल्यापासून ही संख्या सर्वाधिक आहे.