प्रतिनिधी /पणजी
ओल्ड गोवा पणजी बायपास रस्त्यावर चाकूचा धाक दाखवून वाटसरूला लुटणाऱया संशय़िताला ओल्ड गोवा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. याबाबत तिमीर समंता (26 बायगीणी) यांनी तक्रार दाखल केली होती. संशयिताला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशय़ितांचे नाव अल्लादीन अब्दूल माजीकलास (22) असे आहे. शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास तक्रारदार तिमीर समंता पणजीहून ओल्ड गोवाच्या दिशेने जात असताना त्याला वाटेत अडविले चाकूचा दाखवून त्याच्याकडील मोबाईल पैसांचे पाकीट लंपास केले, 18 हजार रुपये किमंतीचा मोबाईल व रोख रक्कम 1 हजार रुपये मिळून 19 हजार रुपये किमंतीचा ऐवज तसेच पाकीटात आधार कार्ड व वाहन चालक परवानाही हाता. संशय़ित पाकीट घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. याबाबत तक्रार दाखळ होताच ओल्ड गोवा पोलिसांनी अवघ्या काही तासातच संशय़िताला अटक केली आहे. ओल्ड गोवा पोलीस पुढील तपास करीत आहेत.









