Abdel Fattah al-Sisi : इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी (Abdel Fattah al-Sisi) हे येणाऱ्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या ( Independence Day ) सोहळ्यास प्रमुख अतिथी ( Chief Guest ) म्हणुन असतील, असे परराष्ट्र मंत्रालयाने आज कळवले आहे. भारत आणि इजिप्त (Egypt) हे दोन्ही देश या वर्षी राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहेत.
अधिक माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे कि, “इजिप्तच्या अरब प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी २०२३च्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रथमच उपस्थित राहणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी १६ ऑक्टोबर रोजी यासंबंधिचे औपचारिक निमंत्रण पत्र इजिप्तच्या अध्यक्षांना सुपुर्द केले. हे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष अल- सिसी यांना निमंत्रण पाठवले होते.”
भारत आणि इजिप्त हे दोन्ही देश या वर्षी आपल्या राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. २०२२- २३ मध्ये भारताच्या G-20 च्या अध्यक्षता कार्यकाळात इजिप्तला ‘अतिथी देश’ म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे, “भारत आणि इजिप्तमध्ये सभ्यता आणि खोलवर रुजलेल्या लोकजिवन हा समान धागा आहे. या संबंधांच्या आधारित दोन्ही देशामध्ये उबदार आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत” असेही निवेदनात म्हटले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









