किंमत 12.49 लाख रुपयेः अत्याधुनिक सुविधांयुक्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टाटा मोर्ट्सने आपली सुधारीत टीगोर ईव्ही आवृत्ती सादर केली आहे. यामध्ये टीगोर ईव्ही पूर्ण चार्ज केल्यानंतर जवळपास 315 किमीचा टप्पा प्राप्त करु शकणार आहे. या मॉडेलची सुरुवातीची किंमत ही 12.49 लाख रुपये राहणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
कंपनीने टीगोर ईव्हीचे प्रकार देखील बदलले आहेत आणि आता एक्सझेडसह एलयूक्स हे टॉप व्हेरियंट म्हणून सादर करण्यात आले आहे.
चार्जिंगवर 315 किमीचे मायलेज
सदरचे मॉडेल टाटाने अपडेट केले असून इलेक्ट्रिक मॉडेल कार आता एका पूर्ण चार्जिंगवर जवळपास 315 किमी इतके अंतर पार करु शकणार आहे. पूर्वीच्या मॉडेलची रेंज 306 किमी इतकी होती. यामुळे या नवीन मॉडेलची पसंती ग्राहकांना पडणार असल्याचा दावा यावेळी कंपनीने केला आहे.
w चार्जरने 59 मिनिटात 10 ते 80 टक्क्यांपर्यंत होणार चार्ज
w 5.7 सेकंदात गाडी 60 किमी धावणार कंपनीचा दावा
w रेन सेन्सिंग व्हायपर, लेदर रॅप्ड स्टीयरिंग व्हील यासह अन्य वैशिष्टय़े
w 8 वर्षांची बॅटरीला वॉरंटी मिळणार
w वॉटर प्रूफ बॅटरी सिस्टम









