प्रतिनिधी/बेळगांव :पूर्वपरवानगीशिवाय दीर्घ काळाची सुट्टी घेतल्याने प्रथमश्रेणी दोन सहाय्यकांना बेळगाव जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बडतर्फ करून आदेश दिले आहेत.
कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी रामदुर्ग तहसील कार्यालयाचे प्रथमश्रेणी सहायक सी.एन नागूर आणि रायबाग तहसील कार्यालयाचे ए.बी बसर्गी यांच्यावर १९५७ च्या नियम क्रमांक ८ अनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.









