Shraddha Murder Case In Delhi : श्रद्धा वालकरची हत्या करणारा तिचा प्रियकर आफताब पुनावालानं काल साकेत कोर्टात हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याची पुन्हा चौकशी केली असता त्यानं श्रद्धासोबत हिमाचल प्रदेशातील शिमल्यात गांजाची खरेदी केल्याची कबुली दिली आहे.पोलिसांना आफताबच्या मोबाईलवरील डिजीटल पेमेंट्सचे तपशील सापडले आहेत. त्यामुळं आता आरोपी आफताबच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
नेमके काय घडले
आफताब आणि श्रद्धा हिमाचलहून १२ मे रोजी दिल्लीत परतले होते.त्यावेळी ते दोघेही एका हॉटेलमध्ये थांबले होते.त्यानंतर काही दिवसांतच आफताबनं श्रद्धाची हत्या केली.श्रद्धाची हत्या करताना आफताब नशेत होता,अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यामुळं आता हिमाचल प्रदेशातून खरेदी केलेल्या गांजाचं सेवन आफताबनं श्रद्धाची हत्या करताना केलेलं होतं का? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. याशिवाय आता आरोपी आफताबनं शिमल्यातून ज्या ठिकाणाहून गांजा खरेदी केली त्या ठिकाणी पोलीस आफताबला घेऊन अधिक तपास करण्यासाठी जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- रागाच्या भरात श्रद्धाचे तुकडे केले; आफताबची कोर्टात कबुली
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









