करमाळा प्रतिनिधी
आज करमाळा शहरात विविध गटातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. त्यांच्याबद्दल केलेले विधान आम्ही कदापी सहन करणार नाही. कोश्यारी हे सतत महापुरुष यांच्याबदल चुकीचे वक्तव्य करून वाद निर्माण करत आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी संतप्त शिवप्रेमींनी कोश्यारी यांच्याविरोधात घोषणा दिल्या. करमाळा येथील सुभाष चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रती आक्षेपार्ह विधान केल्याने सर्व शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. राज्यपलांच्या वक्तव्याचा निषेध करत मंगळवारी शिवप्रेमींनी कोश्यारी यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी बंदोबस्त ठेवला होता.