ऑनलाईन टीम / तरुण भारत :
नवले पुलाजवळ रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातानंतर पुणे महापालिका खडबडून जागी झाली असून, आज सकाळीच पालिकेच्या अतिक्रमण विभागाने 100 पोलिसांच्या बंदोबस्तात नवले पुल परिसरात कारवाईला सुरूवात केली.
नवले पुलावर रविवारी रात्री एका पाठोपाठ तीन अपघात झाले. एका अपघातात कर्नाटकातून तांदूळ घेऊन मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकने 24 वाहनांना उडवले. या अपघातांमध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र, 10 जण गंभीर जखमी झाले. वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर पोलीस, महापालिका, रस्ते विकास महामंडळ यांच्या पथकाने सोमवारी घटना स्थळाची पाहणी करून तत्काळ करण्याच्या उपाययोजना सुचविल्या होत्या. त्यानंतर आज सकाळी सात वाजल्यापासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नवले पुल परिसतील अतिक्रमणावर कारवाई करण्यास सुरूवात केली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जवळपास 100 पोलीस कर्मचारी बंदोबस्ताला होते.
अधिक वाचा : मुख्यमंत्री, मंत्री आता लोकायुक्तांच्या कक्षेत